बीड : स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांनी ऊसतोड कामगारांसाठी संघर्ष उभा केला. आज लोकनेत्या पंकजाताई मुंडे ऊसतोड कामगारांना जिव्हाळा देऊन त्यांना लेकरांप्रमाणे संभाळतात ऊसतोड कामगारांचा विषय राजकारणाचा नसून कष्टकरी कामगारांना प्रतिष्ठा व त्याच्या घामाचे मोल देणारा जीवन मरणाचा लढा आहे. ऊसतोड कामगारांचे फुकटचे श्रेय लुटण्यासाठी हंगामी नेते आ.विनायक मेटे पुढे सरसावले आहेत. श्रेय लुटण्याच्या नादात लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वावर बरळत आहेत यापुढे आमच्या नेतृत्वाबद्दल अवाक्षर जरी बोलाल तर याद राखा असा सज्जड इशारा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षा ड.संगीताताई धसे यांनी दिला आहे.
राजेंद्र मस्के या तरुणाने दहा बाय दहाच्या खोलीत खत विकण्याचा धंदा केला याचा सार्थ अभिमान आहे. स्वतःच्या कष्टावर स्वावलंबी होण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला. कष्ट आणि जनसेवेच्या मार्गावर मला राजकीय आणि सामाजिक यश प्राप्त झाले आहे. त्यांच्या कष्टा मागे जनताजनार्दन यांचे आशीर्वाद आहेत. खत विकले म्हणूनच शेतकरी कामगार गोरगरीब यांच्या समस्या त्यांना समजल्या. त्यांच्या वेदना पासूनच जनसेवेची प्रेरणा मिळाली. म्हणूनच आजही यथाशक्ती लोकांचं दुःख वाटून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते करतात, स्वकर्तृत्व आणि जनता जनार्दनाच्या आशिर्वादावर दोन वेळा जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना गुलाल मिळाला. ज्यांना स्वतःच्या भावाला जन्मभूमीतसुद्धा जिल्हा परिषदमध्ये निवडून आणता आले नाही. त्यांनी कोणाला राजकारणात काय केलं हि भाषा वापरू नये . आतापर्यंत जनतेमधून आपणास एकही पद भूषवता आलेले नाही. समाजाचे प्रश्न घेऊन आणि भावनिक राजकारण करून मागच्या दाराने आपण प्रवेश केलेला आहे. स्वतःचा पराभव आणि नगरपालिकेतील अपयशानंतर राजेंद्र मस्के व त्यांच्या सहकार्यांनी निवडणूका लढवल्या नसत्या तर आपणास उंच मान करून बीडमध्ये सुद्धा येता आले नसते. बापाच्या पायातील जोडा जेव्हा पोराच्या पायात येतो तेव्हा बापानं हि थोडं सबुरीने घ्यावं लागतं. राजेंद्र मस्के यांनी फुत्कार सोडले नाही तर तुमच्या मूळ स्वभाव तिल अघोरी अहंकाराचा दर्प आणि फसवेगिरीचे राजकारण जनतेसमोर मांडले. संस्कार व सुसंस्कृत जनांचा सहवास यामुळे पालीच्या मुखातून बाहेर पडलेल्या गरळीकडे आम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आमच्या नेतृत्वाने काय केले विचारण्यापेक्षा खर्याखुर्या ऊसतोड कामगारांच्या दारात जाऊन त्यांच्याकडे चौकशी करा. जे कामगार ताईंना आपले दैवत मानतात ते नेतृत्व आता धगधगती मशाल आहे. प्रत्येक कामात लुडबूड करून श्रेय घेण्याचा आपला हातखंडा सर्वश्रुत आहे. दुसर्याच्या शिक्यावरील आयत्या लोण्याच्या गोळ्यावर डल्ला मारण्याची सवय लागल्याने प्रत्येक ठिकाणी आपल्या नजरेत लोण्याचा गोळा दिसतो. आपल्या प्रत्येक पावलात स्वार्थ दडलेला आहे. कोरोना काळात ऊसतोड कामगारांना स्वगृही आणण्यासाठी पंकजाताई यांनी केलेले प्रयत्न सर्व कामगारांनी स्वतः अनुभवले आहेत. कामगारांच्या मनातील प्रतिमा पुसण्याचा खोटारडेपणा तुम्ही करू नका. फुकटचे श्रेय घेण्याच्या नादात जनतेच्या मनातून कधी उतराल हे लक्षातही येणार नाही. कामगारांच्या मदतीसाठी आपला हात खिशाच्या बाहेर निघालेला नाही. झाकली मूठ सव्वा लाखाची असू द्या. आपल्या राजकीय यशासाठी आपणही कोणाकोणाचे पाय चाटले हे चांगले माहीत आहे मांजर डोळे झाकून दुध पीतं असले तरी जगाचे डोळे उघडे असतात आपल्या अंधारातील कपटी व मिली भगत राजकारणाला कंटाळून राजेंद्र मस्के सारख्या अनेक युकांनी बंड केले आहे गद्दारी नाही. स्वतःच्या राजकारणासाठी अनेक युवकांचे आयुष्य आणि घरे बरबाद करण्याचं पाप आपण केले आहे . झाडांना सुद्धा मजबूत मुळांची गरज असते तेव्हा झाड फोफावते. त्याप्रमाणे प्रत्येक नेत्यालाही निष्ठावान कार्यकर्त्यांची गरज असते तीच निष्ठा ठेवून तुमचा राजकीय फुलोरा वाढवण्यासाठी तन-मन-धनाने राजेंद्र मस्के सारख्या युवकाने कार्य केले. प्रत्येक चांगल्या वाईट काळात सावलीप्रमाणे आपल्या पाठीशी उभे राहिले कारण ते हाडाचे कार्यकर्ते आहेत. केवळ उपकाराची भाषा वापरून उद्धारकर्ते होऊ नका. तुमच्या राजकीय कारकीर्दीच्या मुळाशी राजेंद्र मस्के यांच्याही घामाचा एक थेंब मुरलेला आहे याचेही भान असू द्या. राजेंद्र मस्के यांच्यासारख्या कार्यशील युवकावर टीका करण्यापेक्षा आ.मेटे यांनी हंगामी नेतेगिरी बंद करावी असा सल्लाही ड.संगीता धसे यांनी दिला आहे.