बीड

उद्यापासून दोन दिवस नरेंद्र पाटील बीडमध्ये, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांचा आढावा आणि मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात सहभागी होणार


बीड : उद्यापासून (1 आणि 2 ऑक्टोबर) दोन दिवस अण्णासाहेव पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, उद्या सकाळी 9 वाजता ते स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालया भेट देणार आहेत, दुपारी साडे बारा वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महामंडळाच्या योजनांचा आढावा घेणार आहेत, तसेच शासकीय विश्रामगृहावर ते महामंडळाच्या लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत, 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता महात्मा गांधी जयंती उपस्थिती व मराठा क्रांती मोर्च्या आंदोलनात सहभाग, सकाळी 11 वाजता श्रमशक्ती कामगार महासंघ प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन तर दुपारी 2 वाजता ते विठाई डाळमिल वेट अँड पार्किंगचे उदघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!