बीड

आ. संदिप क्षीरसागरांनी स्पॉटवर जावून निकृष्ट कामाचे पितळ उघडे पाडले


बीड, दि. 16 : शहरातील विकास कामे कागदावर राबून पिंपरगव्हान रोड येथील नगराध्यक्ष यांनी बोगस कामे करण्याचा डाव आखलेला आहे,पिंपरगव्हाणरोडचे काम घाई गडबडीत करून बोगस गिरी करण्याचा नगराध्यक्ष पिता पुत्राचा डाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यांनी हाणून पाडला,या भागातील नगरसेवक यांच्यासह नागरिकानी आधी अंदाजपत्रक दाखवा,कॉलनी अंतर्गतनाल्या करा,सदरील कामाची माहिती असणारा फलक लावा अशी मागणी केल्यानंतर त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रकार घडला, निकृष्ट दर्जाच्या कामावर आमदर संदीप क्षीरसागर यांनी स्वतःत स्पॉट वर कामाची पाहणी करून पालिकेचे अधिकार्‍यांना लोकांच्या मागणी नुसार अंदाजपत्रका प्रमाणे दर्जेदार काम करण्याचा सूचना दिला,यावेळी बोगस काम करणार्‍यानी पळ काढला असून बोगस कामे करणारेच उलट्या बोबा बून मारत असल्याचे नगरसेवक,रमेश चव्हाण, प्रभाकर पोपळे,गणेश तांदळे,भौय्यासाहेब मोरे,रंजित बनसोडे,आमेर आण्णा,मोसीन सर यांनी म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!