बीड

निरोप समारंभा वरून घरी परतणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा कार अपघातात मृत्यु

बीड, दि. 13 सप्टेंबर : नेकनूर येथून बीडला घरी येत असताना कारवरील ताबा सुटल्याने एका पोलीस कर्मच्याऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा आपघात बीड तालुक्यातील खजाना विहीर परिसरात शनिवारी (दि.12) रात्री 12 च्या सुमारास घडली. महेश अधटराव असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते नेकनूर येथे कार्यरत होते. नुकत्याच झालेल्या बदल्यामध्ये त्यांची गेवराई येथे प्रशासकीय बदली झाली होती. त्यामुळे नेकनूर येथील पोलीस ठाण्यात निरोपाचा कार्यक्रम संपन्न झाला होता. त्यांनतर तेथून ते स्विफ्ट कारने ( एमएच-23, एएस- 6004) घराकडे येत असताना खजाना विहीर परिसरात त्यांचा कारवरील ताबा सुटला. कार डिव्हाईडर वरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला नदीत कोसळली. यामध्ये ते गंभीररीत्या जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी बीड ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक सुजित बडे, पोह.जयसिंग वाघ आदींनी धाव घेतली होती. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला लिंबागणेश येथे वादळी वाऱ्यात एका वृद्ध दाम्पत्याची झोपडी पडली. याच पोलीस दलात असलेले सद्गृहथ महेश आधटराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः साहित्य आणून झोपडी उभा करून दिली. त्या दाम्पत्याला स्वखर्चाने नवे कपडे देखील घेऊन दिले होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!