महाराष्ट्र

…..यामुळे पुण्यात कडकडीत जनता कर्फ्यू लागण्याची शक्यता, अजित पवारांनी दिला मोठा निर्णय

पुणे, 12 सप्टेंबर : जीवघेण्या कोरोनामुळे राज्यावर मोठं संकट कोसळलं आहे. या सगळ्यात आता राज्य अनलॉकच्या प्रक्रियेत आहेत. पण असं असलं तरी कोरोनाचा धोका काही कमी होताना दिसत नाहीये. पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे गरज पडल्यास पुण्यात पुन्हा जनता कर्फ्यू लागू करा अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा कडकडीत लॉकडाऊन होणार असल्याची चिन्ह आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली होती. यामध्ये या संबंधी चर्चा झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्य अनलॉक होत असलं तरी कोरोनाचा धोका वाढतोय. त्यामुळे गरज भासल्यास पुण्यात जनता कर्फ्यू लागू करणार असा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर जनता कर्फ्यू लावणार असाल तर नागरिक, व्यापारी यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्या अशीही स्पष्ट सूचनाही अजित पवारांनी केली आहे. दरम्यान, पुण्यात पुन्हा लॉकडाऊन सुरू होणार अशा अफवा पसरल्या जात होत्या. पण यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करून तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे कुठल्याही अधिकृत घोषणेशिवाय अफवांवर विश्वास ठेवू नका.
एकीकडे कोरोनाचा धोका तर दुसरीकडे पुणे शहरात पॉझिटिव्ह रुग्णांचा दर अर्थात बाधित दर 28 टक्के झाला असून बाधित रुग्णांच्या संख्येने उचल खाल्ली आहे. पॉझिटिव्ह दर हा 5 टक्केच्या खाली असणं अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत आकडा वाढतो आहे. हा आकडा कमी न झाल्यास 4-8 दिवसांत पुण्यात स्थिती बिघडू शकते अशी भीती महापालिककेने व्यक्त केली आहे. अत्यवस्थ रुग्ण संख्या कमी होत नसल्याने icu ,ऑक्सिजन बेड्सची गरज भासत आहे. अशात व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता तर आधी पासूनच आहे. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

पुढच्या 4-8 दिवसांत पुण्यात परिस्थिती बिघडू शकते, पालिकेकडून धक्कादायक खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या रोज साडेसहा हजार नागरिकांच्या चाचण्या होत आहेत. पालिका आयुत विक्रम कुमार यांनी मास्क न वापरणाऱ्यांवर आणि रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर अधिक कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. पण असं असलं तरी रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे पुण्यात कोरोना हाताबाहेर जातो की काय अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्याने कोरोना रूग्णसंख्येचा 2 लाखांचा टप्पा पार केल्याने पुणेकर आता कोरोनाच्या साथीत देशात नंबर 1 झाले आहेत. अर्थात ही काही भुषणावह बाब नाही. अगदी मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांनाही पुणेकरांनी मागे टाकलं आहे. त्यामुळे पुणेकर नेमके चुकले कुठे? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!