बीड : येथील स्थानिक गुन्हे शाखेत काही पोलीस कर्मचारी अनेक वर्षापासून ठाण मांडून बसले होते. स्थानिक गुन्हे शाखा आणि ठरलेले कर्मचारी असे समीकरणच बनले होते. हे सगळं गणित लक्षात घेवून पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी प्रशासकिय बदल्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेत मोठे फेरबदल केले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेतील हेकॉ.भास्कर केंद्रे, तांदळे, पोहेकॉ.रविंद्र गोले, सलीम हबीब शेख, डोंगरे यांच्यासह आदींच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर तुळशीराम जगताप, अभिमन्यू औताडे, श्रीमंत उबाळे, संतोष हांगे, झुंंबर गर्जे, मुदतसर सिद्धीकी, अलिम शेख, शेख अन्वर अब्दुल रौफ, नारायण कोरडे, गोविंद काळे, गणेश नवले यांच्यासह आदींना स्थानिक गुन्हे शाखेशी सलग्न करण्यात आले होते. त्यांनाही मुळ नेमणुकीच्या ठिकाणी परत करण्यात आले आहे. यामुळे स्थानिक गुन्हे शाखेमध्ये आता नवीन चेहरे दिसणार आहेत. मात्र अजुनही काही जुने वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेतच आहेत.
131 कर्मचार्यांच्या बदल्या
गुरुवारी बीड जिल्हा पोलीस दलातील पोलीस नाईक आणि चालक संवर्गातील 131 कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात पोलीस नाईक संवर्गातील 100 तर वाहन चालक संवर्गातील 31 कर्मचार्यांचा समावेश आहे. दरम्यान आतापर्यंत सहाय्यक फौजदार, हेड कॉन्स्टेबल, पोलीस नाईक, वाहन चालक संवर्गातील बदल्या झाल्या आहेत.