महाराष्ट्र

कंगनामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची चर्चा; राज्यपालांनी मुख्य सचिवांना बोलावून व्यक्त केली नाराजी

मुंबई, दि. १० (लोकाशा न्यूज) : राज्य सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या कंगना रनोटच्या कार्यालयावर कारवाई करत मुंबई महानगरपालिकेने कंगनाला दणका दिला आहे. या प्रकरणात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उडी घेतली आहे. मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रनोटच्या वांद्र्यातील कार्यालयाच्या बांधकामाचा भाग पाडण्यात दाखवलेली घाई बाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपाल या वादाबाबत केंद्र सरकारकडे अहवाल पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कंगना रनोटची वक्तव्ये आणि बंगला पाडल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे सचिव अजॉय मेहता यांना बोलावले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगना रनौत प्रकरणाची अयोग्य पद्धतीने हाताळणी केली, अशा शब्दात भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजॉय मेहता यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!