महाराष्ट्र

आयएएस तुकाराम मुंडे पुन्हा सक्रिय; म्हणाले….


बीड, दि.6 (लोकाशा न्युज) ः आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे हे कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या कामात सक्रिय झाले आहेत. त्यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
ते म्हणाले की, प्रबळ इच्छाशक्ती, शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी आज कोरोनावर यशस्वीपणे मात केली. नागपूर महानगरपालिकेच्या सात महिन्यांच्या आयुक्त पदाच्या कार्यकाळातील साडे पाच महिने कोरोना महामारीविरुद्ध यंत्रणा प्रमुख म्हणून कार्य करण्याचा योग आला. यादरम्यान सर्व प्रोटोकॉल पाळले. मात्र कर्तव्य बजावताना मलाही कोरोनाची लागण झाली. 24 ऑगस्ट रोजी चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. शासनाच्या दिशानिर्देशानुसार नियमांचे पालन करत आयसोलेशन पिरियड सुरू झाला. चाचणीचा निकाल आला त्यानंतर दुसर्‍याच दिवशी बदलीचा आदेश आला. घरीच असल्याने मनात विचारांचे काहूर सुरू झाले. मात्र, कुठल्याही नकारात्मक विचारांना थारा न देता सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. कारण कोरोनाच्या पॉझिटिव्ह चाचणीवर मात करायची असेल तर विचारांची सकारात्मकता आवश्यक आहे. ही सकारात्मकता, प्रबळ इच्छाशक्ती आणि आपल्या शुभेच्छांच्या जोरावर आज कोरोनावर पूर्णपणे मात करणे शक्य झाले.  समाजातील दुष्प्रवृत्ती आणि कुविचारांवर मात करण्यासाठीसुद्धा या गोष्टी आवश्यक आहे. चला, समाजात सकारात्मकता रुजविण्यासाठी समविचारी आणि प्रबळ इच्छाशक्ती बाळगणार्‍या व्यक्तींनी एकत्र येऊया या अशायाची पोस्ट त्यांनी केलेली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!