क्राईम बीड

संतोषीमाता संस्थेच्या अध्यक्षांनी उचलले काही लाख ?
ओमप्रकाश जाजूंच्या विरोधात तक्रार दाखल

सेवाभावी आणि धार्मिक संस्थातील अपहार आणि त्यावरून होणाऱ्या चर्चा कमी नाहीत . जुना मोंढा भागातील संतोषीमाता मंदिर असणारे संस्थान चे अध्यक्ष ओमप्रकाश जाजू यांनी संस्थेच्या खात्यातून काही लाख उचलले , सदरील काम नियम मोडून व स्वतचा स्वार्थ साधण्यासाठी केल्याची तक्रार संस्थेतील इतर संचालकांनी केली आहे . पेठ बीड पोलीस ठाण्यात सदरील तक्रार केल्याचे समजते असून सदरील तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला नसून या संदर्भात चौकशी सुरु असल्याचे पोलीस सूत्राकडून कळते आहे .
दक्षिण मुखी हनुमान टेकडी संस्थान बीड चे अध्यक्ष ओमप्रकाश हिरालाल जाजू यांच्या विरोधात अपहार केल्याचा आरोप असलेली तक्रार बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे येथे दाखल असून यावर चौकशी करण्यात येत असल्याची माहिती आहे . देवाच्या नावावर चालणाऱ्या संस्थानात कुणी व्यक्तिगत लाभ घेऊन फसवणूक करणार असतील तर भक्त लोकांच्या दान संपत्ती संदर्भात हा मोठाच अपराध आहे असी चर्चा भक्त वर्गातून होताना दिसत आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!