महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांसह 12 नेते व दीड हजार आंदोलकांवर पंढरपूरात गुन्हे दाखल

पंढरपूर दि.01:- विठ्ठल मंदिराची दार वारकऱ्यासाठी खुली व्हावी यासाठी सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरात आंदोलन झाले. या आंदोलनात प्रकाश आंबेडकर यांच्यासह 12 नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम आणि संचारबंदी उल्लंघन केल्याप्रकरणी पंढरपूर पोलीस स्थानकात प्रकाश आंबेडकर यांच्यासह 1 ते दीड हजार आंदोलकांवर पंढरपूर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. प्रकाश आंबेडकर, आनंद चंदनशिवे, अरुण बुरघाटे, रेखा ठाकूर, अशोक सोनोणे यांच्यासह आंदोलकांवर हा गुन्हा झाला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!