बीड : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढला असला तरी यातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या तिप्पट आहे, जिल्ह्याची कोरोनामुक्तीची टक्केवारी 74.7 एवढी आहे, तर मायताचे प्रमाण 2.6 टक्के आहे, कोरोनामुक्तीचा आकडा वाढत आहे, आज जिल्ह्याभरातून 231 रुग्ण बरे होऊन घरी परतणार आहेत, यामध्ये बीड 24, आष्टी 2, पाटोदा 2, गेवराई 7, माजलगाव 66, वडवणी 1, धारूर 5, केज 4, अंबाजोगाई 42, परळीतील 78 जणांचा समावेश आहे, आत्तापर्यंत जिल्ह्यात 4467 रुग्णांना कोरोनाची बाधा झालेली आहे, 3248 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, 120 मयत तर 1099 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.