महाराष्ट्र

मुंबईत मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास सशर्त परवानगी, राज्यात बंदी

मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं आज महत्त्वाचा निकाल दिला. मुंबई उच्च न्यायालयानं फक्त मुंबईत मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास सशर्त परवानगी दिली आहे. मुंबई वगळता राज्यात कुठेही मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास परवानगी नाही, असंही न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलं आहे. करोनामुळे देशभरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक वार्षिक कार्यक्रमांबरोबर धार्मिक सण उत्सवांवरही सरकारकडून करोना प्रसाराचा धोका लक्षात घेऊन बंधनं आणण्यात आली आहेत. मुस्लीम समुदायात मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यात येते. मात्र, करोनामुळे सोशल डिस्टसिंगसह इतर बंधन आणण्यात आल्यानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं फक्त मुंबईत मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास परवानगी दिली आहे. या मिरवणुकीत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सहभागी होता येणार नाही. त्याचबरोबर मुंबई वगळता राज्यात इतर कुठल्याही भागात मिरवणूक काढण्यास परवानगी नाही, असंही न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलं आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!