बीड

कंटेन्मेंट झोन असलेल्या आश्रमात चोरी! धारूर ठाण्यात गुन्हा दाखल, घटनास्थळी ठाणेदार सुरेखा धस यांनी दिली भेट


धारूर : काही दिवसांपुर्वी कोविड-19 चा प्रादुर्भाव होवून 12 साधकांना बाधा झालेल्या चिंचपूर रोडवरील गिता ज्ञान आश्रमात रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांनी भेट देवून पंचनामा केला. याबाबत धारूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील चिंचपूर रोडवर महानुभाव पंथाचे कृष्ण मंदिर व गिता ज्ञान आश्रम आहे. या आश्रमात पाच पुरुष व 8 वयोवृध्द महिला साधक निवास करतात. काही दिवसांपुर्वी या आश्रमातील 13 पैकी 12 साधकांना कोरोनाची बाधा झाली होती. यामुळे गेल्या आठ दिवसांपासून या आश्रमाला ताळे लावण्यात आलेले आहे. मंगळवारी सकाळी आश्रमाची दारे कुलूप तुटलेल्या आवस्थेत व परिसरात पेट्यांची तोडफोड केलेले आढळून आले. प्राथमिक पाहणीनुसार येथे सोमवारी रात्री चोरट्यांनी रोख रखमेवर डल्ला मारल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलिसांना माहिती कळताच सहायक पोलिस निरिक्षक सुरेखा धस घटनास्थळी दाखल झाल्या. बाधित व प्रतिबंधित क्षेत्र असल्याने सर्व नियमांचे पालन करुन तपास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान याबाबत धारूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!