बीड : बीड जिल्ह्यात कोरोनाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शनिवारी रात्री आलेल्या रिर्पोटमध्ये 689 पैकी 82 जण कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. 603 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर चार जणांच्या रिर्पोटमध्ये कोणताही निष्कर्ष निघालेला नाही, बाधितांमध्ये अंबाजोगाई 17, बीड 29, केज 1, माजलगाव 13, परळी 2, शिरूर पाच, आष्टी 3, वडवणी एक, गेवराई सहा आणि धारूर शहरातील पाच जणांचा समावेश आहे.















