बीड

अमृत सारडाविरुद्ध अमर नाईकवाडे लढतीने राजकीय वातावरण तापले, बीडमधील वार्ड क्रमांक तीन ब च्या निवडणुकीसंदर्भात आयोगाने अहवाल मागवला, दोन डिसेंबरचे मतदान स्थगित झाल्यास वीसला होणार मतदान

बीड, बीड मधील वार्ड क्रमांक तीन ब मधून नगरसेवक पदासाठी भाजपकडून अमृत सारडा तर राष्ट्रवादी कडून अमर नाईकवाडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत या प्रभागांमध्ये अत्यंत अटीटटीचा सामना होत आहे या दरम्यान अमर नाईकवाडे यांनी अमृत सारडा यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता त्यावर निवडणूक आयोगाने आणि न्यायालयाने अमृत सारडा यांचा अर्ज वैद्य ठरवला होता एका बाजूने असे असले तरी दुसऱ्या बाजूने मात्र ज्या ज्या प्रभागाबाबत न्यायालयात अपील दाखल आहे त्या प्रभागाचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाने मागवला आहे त्यामुळे दोन डिसेंबर रोजी होणारी ही निवडणूक स्थगित झाली तर या प्रभागासाठी 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे 21 डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, निवडणूक आयोगाने मागवलेल्या या अहवालामुळे या वार्डात राजकीय वातावरण आणखीनच तापले आहे निवडणूक आयोग शेवटी कोणता निर्णय देतो याकडेही सर्व मतदारांचे आणि बीड करांचे लक्ष लागून आहे दरम्यान 2 डिसेंबर रोजी प्रभाग क्रं 3 ची नगराध्यक्ष व 3 अ ची निवडणूक वेळेवरच
होणार आहे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!