बीड दि.२९(प्रतिनिधी)-येथील पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना पहाटे ३ ते ३.३० च्या सुमारास घडली आहे.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.केजजवळ एका पोलवर गाडी धडकल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जाते.
काल रात्री पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत परळीच्या विद्यानगर भागात गोळीबार झाल्यामुळे तातडीने गेले होते.रात्री उशिरा परळीवरून वापस येताना गाडी वेगात असल्याने केजजवळ एका पोलवर धडकली.यावेळी कारमधील सर्वांनी सेट बेल्ट लावल्यामुळे मोठा अनर्थ टळला.या अपघातात गाडीचे काही नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्यासोबत आरटीपीसी गणेश थापाडे,चालक राहेकोल आणि क्यूआरटीचे पथक देखील सोबत असल्याचे कळते.
अपघाताची घटना कळल्यानंतर पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही अशी प्रतिक्रिया देत मी आणि माझी टीम सुखरूप असल्याचे सांगितले.गाडीत आम्ही सर्वानी सीट बेल्ट लावले होते म्हणून कोणतीही अप्रिय घटना घडली नाही असे ते म्हणाले.















