बीड

डॉक्टर योगेश क्षीरसागर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडचिट्टी

बीड, दि. 15 :- बीड विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक राजकीय घटना घडत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉक्टर योगेश शिरसागर यांनी देखील पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) या पक्षाच्या बीड विधानसभा अध्यक्षपदी काम करत होतो. परंतु वेळोवेळी स्थानिक पातळीवर पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये मला जाणिवपूर्वक डावलले जात असल्यामुळे मी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या कानावर ही बाब अनेक वेळा घातलेली आहे. परंतु यामध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही. त्यामुळे मी माझ्या बीड विधानसभा अध्यक्ष पदाचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा आपल्या कडे सुपूर्द करत आहे.तरी पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारीच्या माध्यमातून मी पक्षाची विचारधारा तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत निष्ठेने व प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पक्षाने टाकलेल्या विश्वासाबद्दल मी सर्व वरिष्ठ नेतेमंडळींचे मनःपूर्वक आभार मानतो.आपण केलेल्या सहकार्याबद्दल असे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी सुनील तटकरे यांना दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!