बीड

घरफोडी करुन चोरी करणाऱ्या आरोपीस 12 तासाचे आत शिवाजीनगर पोलीसांनी केले जेरबंद

दिनांक 06/10/2025 रोजी रात्री 12:30 ते पहाटे 04:00 वा. चे दरम्यान बीड शहरातील स्वराज्य नगर येथील आकाश नवनाथ कातांगडे यांचे राहते घरी घरफोडी करुन चोरी करणारा चोर नामे प्रथमेश किसन जाधव वय 20 वर्षे व्यवसाय मजुरी रा. पंचशील नगर, बीड यास मोठ्या शिताफीने मा. पोलीस अधीक्षक सो., अपर पोलीस अधीक्षक सो., उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन शिवाजीनगर चे पोलीस निरीक्षक श्री. किशोर पवार, यांचे नेतृत्वात सपोनि / गजाजन क्षिरसागर, पोहवा/1664 रवि आघाव, पोना/470 ज्ञानेश्वर मराडे, पोशि/617 अशोक राडकर, पोशि/2077 बाळु रहाडे, पोशि/305 दिलीप राठोड, पोशि/485 विलास कांदे यांनी त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने सुरवातीला खोटी माहिती देवून पोलीसांची दिशाभूल केली परंतु पोलीसांनी तांत्रीक विश्लेषणाचे आधारे आरोपी निष्पन्न करुन गुन्हयात चोरलेला सोन्याचा ऐवज व दोन मोबाईल हे जप्त केले आहे. सदर आरोपी हा अभिलेखावरील गुन्हेगार असुन त्याने यापुर्वी देखील पोलीस स्टेशन शिवाजीनगर हद्दीत व बीड शहर हद्दीत घरफोडी करुन चोरी केली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनित काँवत साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग बीड श्रीमती पुजा पवार यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. किशोर पवार यांचे नेतृत्वात सपोनि/ गजाजन क्षिरसागर, पोहवा/1664 रत्रि आघाव, पोना/470 ज्ञानेश्वर मराडे, पोशि/617 अशोक राडकर, पोशि/2077 बाळु रहाडे, पोशि/305 दिलीप राठोड, पोशि/485 विलास कांदे यांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!