बीड

सीईओंनी प्रशासन केले गतिमान, शिक्षणच्या 11 जणांना कनिष्ठ विस्तारअधिकारी म्हणून दिली पदोन्नती


बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) सीईओ जितीन रहमान यांनी झेडपीचे प्रशासन गतिमान केले आहे. याअनुषंगानेच ते मागच्या दोन दोन वर्षांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लावत आहेत. काल त्यांनी शिक्षण विभागाच्या 11 जणांना सेवा ज्येष्ठतेनुसार कनिष्ठ विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे.
जितीन रहमान यांना बीड झेडपीच्या सीईओ पदाचा पदभार घेवून महिणा झालेला आहे. रूजू झालेल्या अगदी पहिल्या सेकंदापासून ते गतीने काम करत आहेत. त्याअनुषंगानेच ते मागच्या दोन दोन वर्षांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लावत आहेत. वास्तविक पाहता शिक्षण विभागातील पदोन्नतीचा प्रश्नही मागच्या अनेक दिवसांपासून रखडलेला होता. त्याअनुषंगानेच आता सीईओंनी शिक्षणच्या आकरा जणांना कनिष्ठ विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे. यासंदर्भात काल आदेश काढण्यात आले आहेत. यामध्ये शिवाजी विठ्ठल कसरे, मशायेक कनिज फातेमा, सुरेश रामचंद्र पवार, तुळशीराम झुंबर कोकणे, दत्तात्रय वसंतराव कदम, चंद्रकांत श्रीपती भारती, राजेंद्र अंबादास खेडकर, रावन उमाजीराव जोगदंड, अनंत शिवाजीराव कुलकर्णी, उत्तम नामदेव राठोड आणि संजीवनी सर्वोत्तमराव जोशी यांचा समावेश आहे. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!