तलवाडा प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील श्रीपत अंतरवला जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाला गावकऱ्यांनी दारू पितांना पकडले असून त्याचे मेडिकल जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले आहे.या मुळे शिक्षण विभागाची अब्रू चव्हाट्यावर आली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य दारुड्या गुरुजी मुळे अंधारात आले असल्याचे दिसते या शिक्षकावर गटशिक्षण अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील तलवाडा पासून आठरा वीस की मी अंतरावर असलेले गोदाकाठचे गाव श्रीपत अंतरवला येथील जिल्हापरिषद शाळेचे शिक्षक शाळेतच दारू पित असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर गावकऱ्यांनी शिक्षकाला जाब विचारत त्याचे मेडिकल करून शिक्षकावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.या प्रकरणाने शिक्षण विभागाच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगण्याचा प्रकार झाला असल्याने या दारुड्या गुरुजी वर निलंबनाची कार्यवाही होणार का हे पहावे लागेल.















