महाराष्ट्र

खा. नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह


मुंबई : कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात उपचार घेऊन आलेल्या खासदार नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. खासदार नवनीत राणा यांच्यावर मुंबईमधील लिलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. रविवारी (16 ऑगस्ट) त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही दिवस क्वारंटाइन राहणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु मुंबई येथील घरी महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी स्वॅब घेतला. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नागपूरमधील वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरु होते. पण तिथे त्यांनी श्वासनाचा त्रास जाणवू लागल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!
Join WhatsApp Group