बीड, दि. १७:- जिल्ह्यात कोरोना (Covid-19 )विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून या कालावधीत मूर्ती घडवणारे आणि मूर्ती विक्रेते यांना फिरत्या गाड्यावर घरोघर जाऊन त्यांचे मातीचे तयार केलेले बैल, गणेश मूर्ती विकण्यासाठी लॉकडाऊन कालावधीमध्ये 22 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत सूट देण्यात येत आहे. तथापि बीड, गेवराई, शिरूर कासार, आष्टी, पाटोदा, माजलगाव, धारूर, वडवणी,केज, अंबाजोगाई, परळी वै. या शहरातील अशा विक्रेत्यांनी आपापल्या शहरातील शासकीय रुग्णालयात दि. 17 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 3.00 वाजता स्वतःची अॅन्टिजन तपासणी (Antigen Test ) करून घ्यावी असे आदेश
प्रवीण धरमकर अप्पर जिल्हादंडाधिकारी, बीड यांनी हे आदेश दिले आहेत. ज्या विक्रेत्यांना दिनांक 17 ऑगस्ट रोजी अॅन्टिजन तपासणी करणे शक्य होणार नाही त्यांनी दिनांक 18 ऑगस्ट 2020 रोजी हि अॅन्टिजन तपासणी करून घ्यावी. सर्व विक्रेत्यांनी अॅन्टिजन तपासणी साठी जाताना स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवावे. सर्व नागरिकांनी अशा विक्रेत्यांची Antigen Test झाली असले बाबत खात्री करूनच बैल अगर श्री गणेश मूर्ती खरेदी करावी.