बीड

गहिनीनाथगडाचे मठाधिपती महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज यांच्या गाडीचा अपघात, पायाला दुखापत, महाराज सुखरूप

आष्टी (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यातील चिंचोली नाथ येथील श्री क्षेत्र गहिनीनाथगडाचे मठाधिपती ह. भ. प. विठ्ठल महाराज शास्ञी यांच्या गाडीचा आज बुधवार दि.२२ मे रोजी दुपार च्या दरम्यान पाथर्डी जवळील घाटात वळणावर गहिनाथ गडावरून पाथर्डीच्या दिशेने जात असताना अपघात झाला आहे. यामध्ये विठ्ठल महाराजांच्या पायाला दुखापत झाली आहे. ड्रायव्हर जखमी झाला आहे. सुदैवाने महाराज सुखरूप असून त्यांच्या पायाला दुखापत झाली असल्याने प्रथम उपचारासाठी अहमदनगर येथील साईदीप या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील त्यांच्या नेहमीच्या खाजगी रुग्णालयात घेऊन जाणार असल्याची माहिती आहे. अपघात कसा झाला याचे कारण अस्पष्ट असून महाराजांची प्रकृती व्यवस्थित आहे. सतत उपचार घेत असलेल्या पुणे येथील खाजगी रुग्णालयात त्यांना इतर तपासणीसाठी घेऊन जाणार असल्याची समजते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!