बीड

परळीत आठ दिवसात बलात्काराची तिसरी घटना; इंस्टाग्राम ओळख करत लग्नाचे आमिष दाखवून मागासवर्गीय मुलीवर सतत बलात्कार; परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


परळी वैजनाथ दि ७ (लोकाशा न्यूज) :- गेली आठ दिवसात बलात्काराच्या तीन घटना आणि अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याच्या दोन घटनांनी परळी शहर हादरले असून इंस्टाग्राम वर ओळख करून लग्नाचे आमिष दाखवून शिक्षण घेत असलेल्या तरुण मुलीवर सतत सात महिने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली असून परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने शहरात चर्चेत उधान आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील इंदिरानगर भागात राहत असलेल्या एका वीस वर्षीय शिक्षण घेत असलेल्या एका मागासवर्गीय तरुणीची शुभम शिवाजी मुजमले राहणार उखळी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी ह्या तरुणाने इंस्टाग्राम वर ओळख करून परळी शहरातील जिजामाता उद्यान या ठिकाणी २० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता भेटून शहरापासून १२ किलोमीटर अंतरावरील वसंतनगर तांडा शिवारात नेवून लग्नाचे आमिष दाखवून नेहमी म्हणजेच १ एप्रिल २०२४ पर्यंत बलात्कार केले.
याबाबत स्वतः पीडित मुलीने परळी ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून शुभम शिवाजी मुजमले ह्या आरोपी विरुद्ध गु र नंबर ९३/२०२४ कलम ३७६, ३७६(२)(एन) भादविनुसार गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा शेटे पिंक पथक अंबाजोगाई या करीत आहेत.
परळी शहरात गेल्या आठ दिवसात बलात्काराच्या तीन घटना घडल्या असून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. शहरात सततच्या वाढणाऱ्या बलात्कार आणि मुलींना फूस लावून पळवण्याच्या घटना पाहता शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेऊन योग्य त्या कठोर कारवाया कराव्या जेणेकरून अशा प्रकारच्या घटनांना आळा बसेल अशी मागणी सर्वसामान्य सुज्ञ नागरिक करत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!