बीड

बीडच्या तहसीलदारपदी नरेंद्र कुलकर्णी; नायब तहसीलदार पदी प्रशांत जाधवर

बीड, दि.28 (मुकेश झनझने) ः- लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य सरकारने तहसीलदार व नायब तहसीलदार संवर्गातील अधिकार्‍यांना बदल्याने पदस्थापना दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या बीड तहसीलदार पदी आता बीड जिल्हाधिकारी कार्यालयातीलच तहसीलदार (महसूल-2) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बीड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार श्रीमती सिरसट यांच्या सेवानिवृत्तीने रिक्त झालेल्या जागेवर (महसूल-2) आता शिरूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून बीडच्या तहसीलदार पदांचा अतिरिक्त पदभार नायब तहसीलदार सुहास हजारे यांच्याकडे होता. आता बीडला नरेंद्र कुलकर्णी यांच्या रुपाने नियमित तहसीलदार मिळाले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!