मुंबई- राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तिघांना उमेदवारी जाहीर केली आहे.काँग्रेस मधून भाजपवासी झालेले अशोक चव्हाण, माजी आ मेधा कुलकर्णी आणि नांदेड चे अजित गोपच्छडे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
येत्या 27 फेब्रुवारी रोजी देशभरातील 56 राज्यसभा उमेदवारासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र मधून 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या संख्याबळानुसार भाजपने चार जागेवर उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे.एक जागा अजित पवार यांना तर एक जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली आहे.
दरम्यान भाजपने 14 फेब्रुवारी रोजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नांदेड चे अजित गोपच्छडे आणि पुण्याच्या माजी आ मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
चौथ्या जागेचा सस्पेन्स अद्याप कायम असून भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.