बीड

आज तळेगावच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता


लाभ घेण्याचे ग्रामस्थांचे आवाहन
बीड,दि.30(लोकाशा न्युज)ः श्रीक्षेत्र नगदनारायण संस्थाचे मठाधिपती महंत शिवाजी महाराज यांच्या शुभहस्ते बीड तालुक्यातील तळेगाव येथे रविवार दि.24 डिसेंबर रोजी अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झालेला आहे. या सप्ताहास आत्तापर्यंत हभप योगेश महाराज घोलप, हभप संभाजी महाराज, हभप भरत महाराज जोगी, हभप रंगनाथ महाराज सुरळेगावकर, हभप ज्ञानेश्‍वर महाराज तांबे, हभप कल्याण महाराज काळे, हभप सुधाकर महाराज वाघ, हभप अर्जुन महाराज मोटे आदींनी कीर्तन सेवा दिली आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाची आज रविवार दि.31 डिसेंबर रोजी ह.भ.प.महंत शिवाजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे. सकाळी 11 ते 1 या वेळेत कीर्तन होणार असून यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. तरी या महाप्रसादाचा पंचक्रोषीतील भाविक-भक्तांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त तळेगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!