बीड, आंतरराष्ट्रीय तृनधान्य वर्ष 2023 निमित्त कृषी विभाग आणि जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने बीड शहरात आयोजित रोड शो-रॅलीचा रविवारी सकाळी खा. प्रितामताई मुंडे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय स्तरावर हे वर्ष पौष्टिक तृनधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.
*निरोगी आरोग्य आणि सदृढता राखण्यासाठी दैनंदिन जीवनात तृनधान्यांचा अधिकाधिक वापर करावा याकरिता या रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते असल्याचे यावेळी खा. मुंडे यांनी म्हंटले. यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहसनी देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह आदीची उपस्थिती होती.