बीड

अभिष्टचिंतनानिमित्त कलेक्टरांवर जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव, सरकारी रुग्णालयात रक्तदान करणार्‍या दिपा मुधोळ ठरल्या पहिल्या जिल्हाधिकारी




बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) : जिल्हाधिकारी दिपा मुधोळ ह्या एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांचे काम खरोखरच कौतूकास्पद आणि जिल्ह्याच्या फायदाचे आहे. त्यांच्या कामातून अनेकांना न्याय मिळत आहे. परळी हे त्यांचे सासर असून त्यांच्या कामावर संपूर्ण जिल्हा खर्‍या अर्थाने खुश आहे. त्यामुळेच अभिष्टचिंतनानिमित्त काल संपूर्ण जिल्हाभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. आपला वाढदिवस भव्य दिव्य प्रमाणात साजरा न करता एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सरकारी दवाखान्यात जाऊन रक्तदान करणार्‍या दीपाताई मुधोळ मुंडे ह्या बीडच्या पहिल्या जिल्हाधिकारी ठरल्या आहेत. त्यांचे या राष्ट्रीय कार्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
दिपा मुधोळ मुंडे यांचे सासर परळी तालुक्यातील कन्हेरवाडी हे आहे. मराठवाड्याचे आयकर आयुक्त विश्‍वास मुंडे हे त्यांचे पती असून आपल्या कर्तव्यातून बीड जिल्ह्याला कसा फायदा होईल याअनुषंगानेच ते दोघेही खर्‍या अर्थाने काम करीत आहेत. जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारून जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांना आणखी एक वर्षही पुर्ण झालेले नाही, यादरम्यानच्या काळात त्यांनी सदैव बीड जिल्ह्याचे हित डोळ्यासमोर ठेवूनच  काम केलेले आहे. याचा जिल्ह्याला आज मोठा फायदा होत आहे. कोणताही प्रश्‍न तात्काळ मार्गी लावण्यात त्यांचा हातखंडा आहे. यामुळेच संपूर्ण जिल्हा त्यांच्यासोबत ताकतीने उभा आहे. कर्तव्यदक्षपणामुळे एक लोकप्रिय जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात आहे. काल अभिष्टचिंतनानिमित्त संपूर्ण जिल्हाभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. आपला वाढदिवस भव्य दिव्य प्रमाणात साजरा न करता एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सरकारी दवाखान्यात जाऊन रक्तदान करणार्‍या दिपा मुधोळ मुंडे ह्या बीडच्या पहिल्या जिल्हाधिकारी ठरल्या आहेत. त्या काल परळीत शासकीय रेस्ट हाऊसच्या उद्घाटनासाठी आल्या होत्या. त्यापूर्वी त्यांनी परळी उपजिल्हा रुग्णालयात येऊन रुग्णालयाची पाहणी केली. तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान केले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. परळी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण गुट्टे यांनी त्यांचे यावेळी स्वागत केले. जिल्हाधिकारी असतानाही अतिशय साधेपणाने वाढदिवसानिमित्त रक्तदान करून राष्ट्रीय कार्य बजाविणार्‍या दिपा मुधोळ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे संपूर्ण बीड जिल्हावासियांना न्याय देणार्‍या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे पती विश्‍वास मुंडेही मोठठ्या ताकतीने काम करीत आहेत. येणार्‍या काळात नक्कीच या दोघांच्या कामांचा बीड जिल्हावासियांना मोठा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!