बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : आमच्या पप्पांनी गणपती आणला… या गाण्याच्या चालीला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी नवे शब्द देत आपलं नवं गाणं तयार करून एक व्हिडीओ तयार केला आहे. चष्मा लागल्यानंतर त्यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. यामध्ये त्यांनी ताईला चष्मा लागला असे म्हणत जवळचं कमी दिसत होतं. आता अधिक स्पष्ट दिसेल असे त्यांनी म्हटले आहे.
चष्मा लागल्यानंतर भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी मिश्किल वक्तव्य केल्याचे पाहायला मिळत आहे. जवळचं कमी दिसत होतं. आता चष्मा लागल्यामुळे अधिक स्पष्ट दिसेल असं वक्तव्य पंकजाताई मुंडे यांनी केले आहे. इतकंच नाही तर त्यांनी एक गाणं गायल्याचेही पाहायला मिळाले. आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्याच्या चालीला त्यांनी नवे शब्द देत आपलं नवं गाणं तयार करून एक व्हिडीओ तयार केला आहे. चष्मा लागल्यानंतरचा त्यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. यामध्ये त्यांनी ताईला चष्मा लागला असे म्हणत जवळचं कमी दिसत होतं. आता अधिक स्पष्ट दिसेल असे म्हटले आहे. दरम्यान, हा खोचक टोला त्यांनी नेमका कुणाला लगावला आहे. याची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.















