बीड

आ. सोळंके यांच्या शाळा,महाविद्यालयात तोडफोड तर सहकारी संस्था पलीकतही जाळपोळ

बीड- शांततेत सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन उग्र झाले आहे.मनोज जरांगे यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करून आग लावल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या शाळा ,महाविद्यालयात जाऊन दगडफेक करत तोडफोड केली. नगर परिषद कार्यालयाला देखील आग लावण्यात आली.
आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठवाड्यात आंदोलन उग्र स्वरूप घेत आहे.जरांगे पाटील यांनी शांततेचे आवाहन केले असले तरी आंदोलक आक्रमक झाले आहेत.जरांगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे आ प्रकाश सोळंके यांच्या घरावर तुफान दगडफेक करून गाड्यांची जाळपोळ केल्यानंतर आंदोलकांनी नगर परिषद कार्यलयाला आग लावली.
मराठा समाज आंदोलक यांनी सुंदरराव सोळंके महाविद्यालयात तसेच सोळंके यांच्या ताब्यातील शाळांमध्ये जाऊन तोडफोड करत तुफान दगडफेक केली. आष्टीमध्ये तहसीलदार यांची गाडी पेटवण्यात आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!