बीड

सचिन रामकृष्ण भालशंकर यांचे निधन

बीड दि.28:- बीड शहरातील अंकुश नगर भागातील कर्तबगार व्यक्तिमहत्व अल्प कालावधीत मध्ये आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण करत राजकीय घडामोडीत एक वेगळं नाव करणारे सचिन रामकृष्ण भालशंकर (अप्पा) (वय 42 वर्षे) याचे अल्पशा आजाराने रविवारी रात्री निधन झाले. त्यांच्या या अचानक जाण्याने भालशंकर कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
ऐन उमेदीच्या काळामध्ये घरातील कर्ता पुरुष गेल्याने भालशंकर कुटूंबियावर दुःखाचे डोंगर कोसळला आहे. कुठलाही राजकीय वारसा नसतांना राजकीय पटलावर एक वेगळं अस्तित्व निर्माण करणारे सचिन भालशांकर होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, मुले अस परिवार आहे. अंकुश नगर येथील स्मशानभूमी येथे सायंकाळी ५.५० वा. अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. दैनिक लोकाशाचे व्यवस्थापक अतुल भालशंकर यांचे ते चुलते होते. तर बलभीम महाविद्यालय बीड येथील शिक्षकेत्तर कर्मचारी श्री महेशराज भालशंकर यांचे ते छोटे बंधू होते.भालशंकर कुटुंबांच्या दुःखात दैनिक लोकाशा परिवार सहभागी आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!