बीड

जिल्ह्यातील दोन गुंडांना कलेक्टर, एसपींनी दिला एमपीडीएचा दणका, 107 गुन्हे करणार्‍या बीडमधील गुंडासह परळीत बनावट दारू तयार करून विक्री करणार्‍या गुंडाला स्थानबध्द करून हार्सूलच्या कारागृहात पाठविले  

 
बीड/परळी, दि. 21 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात दशहत आणि गुंडगिरी करणार्‍यांना कायमची अद्दल घडविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दिपा मुधोळ आणि पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केलेला आहे. त्याअनुषंगानेच सध्या एमपीडीए अंतर्गत गुंडांवर गतीने कारवाई केली जात आहे. अशाच दोन गुंडांना कलेक्टर, एसपींनी एमपीडीएचा दणका दिला आहे. तब्बल 107 गुन्हे करणार्‍या पेठ बीडमधील एका गुंडासह परळीत बनावट दारू तयार करून तिची विक्री करणार्‍या गुंडाला स्थानबध्द करून त्यांची रवानगी हार्सूलच्या कारागृहात करण्यात आली आहे. कलेक्टर, एसपींनी केलेल्या या कारवाईमुळे बीड जिल्ह्यातील गुंडांचे धाबे दणाणले आहेत.
बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचे व वाळु माफीयांचे तसेच हातभट्टीची दारु तयार करुन विक्री करणार्‍याचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून एमपीडीए कायद्या अंतर्गत बर्‍याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचे योजिले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक, बीड यांचे सुचनेवरुन पोलीस निरीक्षक श्री. सलीम चाऊस पोलीस ठाणे संभाजीनगर, परळी यांनी दि. 29 जुलै 2023 रोजी इसम नामे पिंटु ऊर्फ सिध्दार्थ भगवान देवडे (वय 38 वर्षे रा. अशोक नगर, परळी वै. ता. परळी वै. जि.बीड) याचे विरुद्ध एमपीडीए कायद्या अंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी दिपा मुधोळ यांना सादर करण्यात आला होता.  सदर स्थानबध्द इसमा विरुद्ध पोलीस ठाणे संभाजीनगर, येथे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग अंबाजोगाई, पाथरी व सोनपेठ यांचे अभिलेखावर नशा कारक किंवा अपायकारक औषधी द्रव्य (बनावट दारु) तयार करणे, तिची चोरटी विक्री करणे, ताब्यात बाळगणे, घराविषयी आगळीक करणे, दंगा करणे, जबरी चोरी करणे, दुखापत करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, गैर कायदयाची मंडळी जमविणे वगैरे स्वरुपाच्या 06 गुन्हयांची नोंद होती. त्यापैकी (04 गुन्हे न्यायप्रविष्ट असुन 02 गुन्हे तपासावर आहेत. सदरील इसम हा बनावट दारू तयार करुन चोरटा व्यापार करीत असल्याने पोलीसांची त्याचेवर बर्‍याच दिवसांपासून करडी नजर होती. सदर इसमावर यापुर्वी उीझउ कलम 110 प्रमाणे तसेच कलम 56 (1) अ मपोका व कलम 93 महाराष्ट्र मदय निषेध अधिनियम प्रमणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु सदर इसम हा प्रतिबंधक कारवाईस न जुमानता पुन्हा जोमाने बनावट दारू तयार करुन, ताब्यात बाळगुन तिची चोरटी विक्री करण्याचे गुन्हे तसेच दहशत पसरविण्याचे गुन्हे करण्याचे चालूच ठेवुन होता. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांचे आदेश क्रमांक जा.क्र. 2023/ आरवी डेस्क- 1 /पोल- 1 /एम. पी. डी.ए.-09 दि. 10.08.2023 अन्वये सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत आदेश पारीत करून सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हर्सुल कारागृह औरंगाबाद येथे हजर करून स्थानबध्द करण्याबाबत त्यांच्याकडील आदेश पारीत केले होते. त्यानंतर पोलीस अधिक्षकांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना पो.नि. श्री. सलिम चाऊस पो.स्टे. संभाजीनगर, परळी वै. व पो.नि. संतोष साबळे, स्थागुशा बीड यांना दिल्या होत्या. स्थागुशा बीड यांचे टिमने गोपनीय खबर्‍याचे आधारे सदर स्थानबद्ध इसमास दि. 21 ऑगस्ट 2023 रोजी 10.50 वा. ताब्यात घेऊन पोलीस ठाणे संभाजीनगर, परळी वै. येथे हजर केले व त्यानंतर योग्य पोलीस बंदोबस्तात हसूल कारागृह, औरंगाबाद येथे 21 ऑगस्ट 2023 रोजी हजर करुन स्थानबध्द केले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, श्रीमती कविता नेरकर पवार, उपविपोअ अंबाजोगाई श्री. अनिल चोरमले, पो. नि. श्री. संतोष साबळे, स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. सलीम चाऊस, पोअं मस्के, सानप, पोउनि पंतगे पो.स्टे. पाटोदा व बीड स्थागुशा चे पोह अभिमन्यु औताडे, पोउपनि तुपे, कैलास ठोंबरे, राहुल शिंदे, भागवत शेलार, गणेश मराडे व विकी सुरवसे यांनी केलेली आहे. भविष्यातही बनावट दारु तयार करणारे, हातभट्टीची दारु तयार करणारे, विक्री करणारे व वाळुचा चोरटा व्यापार करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे व्यक्ती यांचेवर व दादागिरी करणार्‍या व खंडणी बहादर गुंडावर जास्तीत जास्त एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर यांनी दिले आहेत. तसेच आणखी एका प्रकरणात बीडमधील एका गुंडावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार पेठ बीड  ठाण्याचे पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद पोलीस ठाणे पेठ बीड यांनी 3 ऑगस्ट रोजी  शेख अख्तर शेख रशीद (वय 30 वर्षे रा. अचानक नगर, बिलाल मज्जीद जवळ, गांधीनगर बीड ता. जि.बीड) याच्या विरुद्ध एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी बीड यांना सादर केला होता. सदर स्थानबध्द इसमा विरुद्ध पोलीस ठाणे पेठ बीड येथे औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्याचे उल्लंघन करणे, जिवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणे, विनयभंग करणे, महिलांचा पाठलाग करणे, फसवणुक करणे, पुरावा नष्ट करणे, घरफोडी करणे, चोरी करणे, दुखापत करणे, रस्ता आडविणे, मारहान करणे, जिवे मारण्याची धमक्या देणे, शिवीगाळ करणे वगैरे स्वरुपाचे 107 गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. त्यापैकी 05 गुन्हे न्यायप्रविष्ट असून 02 गुन्हे पोलीस तपासावर आहेत. सदरील इसम हा शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गंभीर गुन्हे करत असल्याने पोलीसांची त्याचेवर बन्याच दिवसांपासून करडी नजर होती. तसेच त्याचेवर यापूर्वी उीझउ 110 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु सदर इसम हा प्रतिबंधक कारवाईस न जुमानता पुन्हा चढत्या क्रमाने गुन्हे करण्याची श्रृंखला चालूच ठेवून होता, त्याची पो.स्टे. पेठ बीड हद्दीत व बोड शहरात दहशत आहे. त्याचे विरुध्द लोक फिर्याद देण्यास अथवा साक्ष देण्यास समोर येत नाहीत. तो सर्वसामान्य लोकांना त्रास देवून दहशत निर्माण करतो. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी दि. 21 ऑगस्ट 2023 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम. पी.डी.ए. कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हसूल कारागृह औरंगाबाद येथे हजर करून स्थानबध करणे बाबत त्यांचे कडील आदेश क्रमांक जा. क्र. 2023/आरबी डेस्क- 1/पोल-1/ एम.पी.डी.ए 4820-10 दिनांक 21.08.2023 अन्वये आदेश पारीत केले होते. त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सूचना पो.नि. आजिनाथ काशीद पो.स्टे. पेठ बीड व श्री. संतोष साबळे पो. नि. स्थागुशा बीड यांना दिल्या होत्या. पो. नि. स्थागुशा यांनी आपल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मार्फतीने सदर प्रस्तावित स्थानबद्ध इसमास दि.21 ऑगस्ट 2023 रोजी 15:45 वा. ताब्यात घेवुन पोलीस ठाणे पेठ बीड येथे हजर केले व त्यानंतर योग्य पोलीस बंदोबस्तात हर्सल कारागृह, औरंगाबाद येथे दि.21. ऑगस्ट 2023 रोजी हजर करून स्थानबध्द केले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षक बीड श्री सचिन पांडकर, उपविपोअ आष्टी श्री. संतोष वाळके, पो. नि. श्री. संतोष साबळे, स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. आजिनाथ काशीद, पोउपनि गणेश जागडे, सुभाष मोठे, सर्व पो स्टे पेठ बीड तसेच पोह अभिमन्यु औताडे, पोउपनि श्रीराम खटावकर, मनोज वाघ, प्रसाद कदम विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, आंधळे, अशोक कदम, विकास राठोड, खांडेकर, विकी सुरवसे सर्व स्थागुशा बीड यांनी केलेली आहे. भविष्यातही वाळूचा चोरटा व्यापार करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे व्यक्ती यांचेवर व दादागिरी करणार्‍या व खंडणी बहादर धोकादायक गुंडावर जास्तीत जास्त एमपीडीए कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकुर यांनी दिले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!