बीड

आता एलसीबीचा अतिरिक्त पदभार पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्याकडे

बीड : कार्यकाळ संपलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आज केल्या. यामध्ये अनेक ठाणेदारांची खांदेपालट करण्यात आली आहे. यात स्थानिक गुन्हे शाखेला कोणताच अधिकारी देण्यात आलेला नसून स्थानिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त पदभार नव्याने आलेले पीआय शिवाजी बंटेवाड यांच्याकडे अतिरिक्त परभार देण्यात आलेला आहे. यांचे जर काम चांगले राहिले तर त्यांच्याकडेच हा पदभार कायम राहू शकतो.

स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. आज झालेल्या ठाणेदार यांच्या बदल्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेला कोणताच अधिकारी देण्यात आलेला नाही, या शाखेचा पदभार बीड जिल्ह्यात नव्याने आलेले पीआय शिवाजी बंडेवाड यांच्याकडे तात्पुरता देण्यात आला आहे. परंतु यांचे जर कामकाज चांगले राहिले तर हा पदभार त्यांच्याकडेच कायम राहील अशी शक्यता दिसत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!