बीड

‘पत्नी’चा मृतदेह ऐका खोलीत तर दुसऱ्या खोलीत ‘पती’ लटकलेल्या अवस्थेत आढळला

बीड : तालुक्यातील नाळवंडी येथील बाबासाहेब रावसाहेब म्हेत्रे व कुषीवर्ता बाबासाहेब म्हेत्रे यांचे रा. नाळवंडी ता.जि.बीड पती-पत्नी यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या नाळवंडी गावातील हे शेतकरी पती-पत्नी आहेत दोघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आला आहे राहत्या घरी एका खोलीत पत्नी मृत अवस्थेत आढळली तर दुसऱ्या खोलीमध्ये पती गळफास घेऊन लटकलेला आढळल्याने खळबळ उडाली आहे.
ही घटना दिनांक ३ मे रोजी मध्यरात्री घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे, या दोन्ही पती-पत्नीचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही मात्र पतीने पत्नीची हत्या करून पुन्हा स्वतः गळफास घेतला असल्याची कुजबुज सुरू आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ‘कैलास भारती’ यांनी घटनास्थळावर भेट दिली असून याप्रकरणी तपास केला जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!