शहरातील धानोरा रोड परिसरातील पालवन चौक परिसरात आज (ता. २०) रोजी सकाळी एक खून झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिवाजी नगर पोलीस दाखल झाले असून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पुढील प्रक्रियेसाठी नेण्यात आला आहे.
दत्ता राधाकिशन इंगळे वय ४०, (रा. हिवरसिंगा ता. शिरुर कासार) असे मयताचे नाव आहे. मयत बीड शहरातील एका हॉटेल मध्ये काम करत होता. शिवाजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड व त्यांची टिम घटनास्थळी दाखल असून पुढील तपास करत आहे