बीड, दि. 14 (लोकाशा न्यूज) : अन्न व औषध प्रशासनाने काल गेवराईतील कल्पतरू एजन्सीवर छापेमारी करून 2096 किलो तेलाचा साठा जप्त केला आहे. तर विषबाधेप्रकरणी माजलगावमधील एक हॉटेलही बंद करण्यात आले आहे.
शुक्रवारी अन्न व औषध प्रशासन बीड कार्यालयाच्या वतीने में.कल्पतरू एजन्सी, मोंढा, गेवराई जि. बीड या पेंढीची तपासणी केली. सदर पेंढीतून रिफेंड सोयाबीन तेल व आर.बी.डी.पामोलिन या खाद्य तेलाचे नमुने घेऊन उर्वरित साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत 2,096 किलो साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 2,43,010 एवढी आहे. सदर ठिकाणी सुट्टे तेल विकणे व भेसळचा संशय होता. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई सहआयुक्त औरंगाबाद श्री. वंजारी यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त बीड श्री. सय्यद इम्रान हाश्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्री. महेंद्र बाबुराव गायकवाड यांनी नमुना सहायक श्री. उमेश कांबळे व वाहन चालक श्री. भास्कर घोडके यांनी केली. तर माजलगावमधील गायत्री हॉटेलमध्ये जेवण केलेल्या चार ते पाच जणांना भाजीतून विषबाधा झाल्याची घटना दि.12 रोजी घडून आली होती,संबंधित बधितांवर शहरातील देशपांडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते केलेल्या जेवणातून विषबाधा झाली असे डॉक्टरांनी केलेल्या निदानात निष्पन्न झाले त्यानुसार दि.13 रोजी या या हॉटेलवर अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी कारवाई करत सदरील हॉटेल बंद केले आहे. या झालेल्या कारवाईमुळे हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.