बीड

टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांची यादी आली समोर

जिल्ह्यातील 39 शिक्षकांचा यामध्ये समावेश

राज्यभर गाजलेल्या टीईटी घोटाळ्यात दोषी आढळून आलेल्या आणि बोगस प्राणपत्रावर नोकरीत असलेल्या 576 शिक्षकांचे वेतन बंद करण्यात आले आहे. यामध्ये औरंगाबाद विभागातील चार जिल्ह्यातील 232 शिक्षकांचा समावेश आहे.बीड जिल्ह्यातील 40 शिक्षक आहेत. राज्यातील 7874 शिक्षकांनी बोगस कागदपत्रांच्या आधारावर टीईटी (tet exam) परीक्षा दिल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. या सर्व उमेदवारांवर नोकरीतून बडतर्फी तसेच प्रमाणपत्र रद्द करून पुन्हा परीक्षा न देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. या प्रकरणात राज्य शालेय परीक्षा परिषदेने नुकतेच एक पत्र सर्व शिक्षणाधिकारी यांना काढले आहे. ज्यामध्ये 7874 पैकी 576 शिक्षकांना वेतन अदा करण्यासाठी शालार्थ आयडी देण्यात आला असल्याचे म्हटले आहे.

या 576 शिक्षकांचे शालार्थ आयडी रद्द करण्यात येऊन या महिन्यापासून त्यांचे वेतन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वेतन बंद करण्याचा निर्णयाबरोबरच या शिक्षकांचे शालार्थ आयडी गोठवण्याच्या सूचना संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या अपात्र यादीतील शिक्षक हे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिक्षक सेवक किंवा सहशिक्षक पदावर कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. हे शिक्षक अपात्र ठरल्यानंतर सुद्धा शालार्थ प्रणालीद्वारे वेतन अनुदान घेत होते. त्यामुळे या अपात्र शिक्षकांना ऑगस्टपासून वेतनापासून वगळण्यात यावे अशा सूचना शिक्षण संचालकांकडे देण्यात आले आहेत.TET परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी 7 हजार 880 उमेदवारांकडून प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपये घेण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हा गैरव्यवहार मोठा असल्याचे बोलले जात आहे. 2019 साली झालेल्या टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत तब्बल 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचे पुणे सायबर पोलीसांच्या तपासात उघड झाले होते. एकूण 7874 पैकी 576 शिक्षकांना शालार्थ आय डी म्हणजेच वेतन देण्यात येत होते.जे बोगसगिरी करून नोकरीस लागलेले आहेत.यातील 232 शिक्षक हे मराठवाड्यातील औरंगाबाद विभागामधील बीड,परभणी,हिंगोली, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत.यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 120,बीड जिल्ह्यातील 39,हिंगोली, जालना जिल्ह्यातील प्रत्येकी दहा आणि परभणी जिल्ह्यातील 50 शिक्षकांचा समावेश आहे.
या सर्व बोगसगिरी करणाऱ्या शिक्षकांचे ऑगस्ट 2022 पासून वेतन अदा करून नये अन्यथा संबंधित शिक्षणाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा ईशारा शिक्षण संचालक डॉ.दिनकर पाटील यांनी दिला आहे.

यामध्ये बीड जिल्ह्यातील पुढील शिक्षकांचा समावेश आहे. 

1. अजय शामराव जाधव- महात्मा फुले संत धुराबाई प्राथमिक विद्यालय अंबाजोगाई

2. सीमा रंगराव रुदरे -योगेश्वरी नूतन विद्यालय अंबाजोगाई
3. परमेश्वर बाबुराव राठोड -खोलेश्वर प्रा विद्यालय अंबाजोगाई
4. पूजा धोंडीराम कांबळे -खोलेश्वर प्रा.विद्यालय अंबाजोगाई
5. पूजा भास्कर मस्के -खोलेश्वर प्रा.विद्यालय अंबाजोगाई
6. संतोष किसन आडे -खोलेश्वर प्रा.विद्यालय अंबाजोगाई
7. रमाबाई बाबासाहेब जाधव -नेताजी प्रा.विद्यालय अंबाजोगाई 
8. कौस्तुभ विजयानंद शिंदे -नेताजी प्रा.विद्यालय अंबाजोगाई
9. नसरीन अब्दुल रहेमान शेख -मिरजा हसमतूल्ला बेग उर्दू प्रा.आष्टी
10. मीना भीमराव टेके -चनपावती प्रा.विद्यालय बीड
11. उर्मिला अवधूत वाडे -चंपावती प्रा.विद्यालय बीड
12. मुक्ताबाई नरहरी सोगे -चंपावती प्रा.विद्यालय बीड

13. प्रशांत दत्तात्रय कुलकर्णी चंपावती प्रा.विद्यालय बीड

14. अमोल शिवाजी पाटोळे गीता कन्या प्रा.शाळा बीड 
15. द्रौपदी वैजनाथ सानप संत तुकाराम प्रा.शाळा बीड

16. शमिका बन्सीधर रांजवन स्वा सावरकर विद्यालय बीड
17. ज्योती गोरखनाथ फुलझळके कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले प्रा.शाळा बीड
18. गंगासागर आसाराम कदम कर्मयोगिनी,सावित्रीबाई फुले प्रा.शाळा बीड
19. यगंधर महादेव तुपे,कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले प्रा.शाळा बीड
20. वर्षारणी संभाजी निरडे विद्यानिकेतन कन्या प्रा शाळा धारूर

21. स्वप्नील सुदाम शिंदे,जनता प्रा विद्यालय धारूर

22. गणेश उद्धव वरकाळे सरस्वती विद्यालय धारूर

23.प्रणिता प्रकाश कुलकर्णी सिद्धेश्वर विद्यालय माजलगाव

24. सविता सूंदर पवार -सिद्धेश्वर विद्यालय माजलगाव
25. जिशान हमीद शेख- बुखारी प्रा शाळा माजलगाव 
26. सिद्दीकी यास्मिन जिया अहमद -बुखारी प्रा शाळा माजलगाव
27. कौसर नवाबखान पठाण -बुखारी प्रा.शाळा माजलगाव 
28. सुहासिनी बालाजी ढोबळे -शिव छत्रपती विद्यालय परळी

29. विकास अर्जुन लोंढाळ शिवछत्रपती विद्यालय परळी

30. विश्वास बाळासाहेब काळे शिवछत्रपती विद्यालय परळी 
31. अनवरी बेगम मुख्तार अहमद सय्यद इमादुल उलूम प्रा शाळा परळी
32. साजिया मुनिससोद्दीन सिद्दीखी इमदालु उलूम परळी

33. फरहीन बेगम सय्यद,इमदालु उलूम परळी

34. कौसर बेगम शकिल खान इमदादूल उलूम परळी

35. इरफान जमली सययद इमदादू उलूम परळी
36. अब्दुल सलाम अब्दुल मुख्तार इमदादू उलूम परळी

37. खान कौसर बेगम शकील इमदादू उलूम परळी
38.सुप्रिया अरुण तांदळे,संस्कार प्रा शाळा परळी

39. कावेरी दिलीप सानप सरस्वती साधना विद्यामंदिर शिरूर

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!