गर्भलिंग निदान चाचणी करणारा डॉक्टर आरोपी सतीष बाळु सोनवणे रा.जाधववाडी ता.जि. औरंगाबाद याला अहमदनगर येथून ताब्यात घेवून घेण्यास बीड पोलिसांना यश आले आहे. त्यांने मयत महिलेची गर्भलिंग निदान चाचणी केली असल्याची कबुली पोलिसांना दिली. असल्याची माहिती पेलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
दिनांक 08/06/2022 रोजी फिर्यादी नामे महादेव नानासाहेब ढाकणे वय 57 वर्षे व्यवसाय पो. उप. नि.नेमणुक पिंपळनेर यांचे फिर्यादीवरुन पो.स्टे. पिंपळनेर येथे गुरंन 70/2022 कलम 304, 312, 314, 315, 316, 34 भादवी व इतर अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचे अनुषंगाने मा.पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर गुन्हयातील गर्भलिंग निदान चाचणी करणारा मुख्य आरोपीस अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्याचा तपास सुरु असतांना नगर येथून त्या डॉक्टराच्या मुसक्या
बांधल्या. ही कारवाई पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर अधिक्षक सुनिल लांजेवार, पोलिस उपाधिक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन पिंपळनेर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली.