बीड:- आष्टी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मनोज चौधरी यांच्या पत्नी माधुरी चौधरी यांच्या आठ महिन्या पूर्वीच्या फिर्यादीवरून आमदार सुरेश धस यांच्यासह ३८ जनावर दाखल झालेल्या गुन्ह्यात आता दरोड्या सारखी गंभीर कलमे वाढविण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले आहेत .
विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस यांनी आठ महिन्यांपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांसह राजकीय सूडबुद्धीने आपल्या घरांची संरक्षक भिंत पाडली आणि संरक्षक भिंतीचे साहित्य गॅस कटरने कापून घेऊन गेले अशी फिर्याद दिली होती . पूर्वी पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम १४३ ,१४७ ,१४८ ,१४९ ,४२७ ,३३६ , आणि ३७९ ही कलमे लावली होती. मात्र पुन्हा या कलमात वाढ करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
असे होणार कलमात बदल
आता नव्याने या कलमा ऐवजी दरोडा ३९५ , बेकायदा घरात घुसणे ४४८ , चुकीच्या पद्धतीने एखाद्याला रोखून भीती दाखवणे ४५२ , यासह शांतता भंग करणे आणि इतर ३४१ ,५०४ ,५०६ ही कलमे लावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले.