बीड

वाद चिघळला, रविंद्र क्षीरसागरांसह
इतरांवरही गुन्हा दाखल



बीड, दि. 26 : बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात कुकरीने हल्ला करीत सतीश पवार आणि इतरांना रजिस्ट्री करण्यापासून रोखल्याच्या तक्रारीवरून रविंद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर,अर्जुन क्षीरसागर यांच्यासह इतरांवर प्राणघातक हल्ल्यासह दरोडयाचे गुन्हे दाखल झाले आहेत.
शुक्रवारी बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात गोळीबाराची घटना घडल्यानंतर शनिवारी त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. आम्ही जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून जागा खरेदी करित होतो. त्यावेळी शुक्रवारी रजिस्ट्री कार्यालयात रविंद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर, सतीश क्षीरसागर, फारुक सिद्दीकी,आनंद पवार, गणेश भरनाळे, अशोक रोमण आदिंनी रजिस्ट्री का करतो म्हणून मारहाण केली, तसेच कुकरीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसेच लाखोंची रक्कम लांबविली अशी फिर्याद सतीश पवार यांची बहिण प्रतिभा श्रीराम क्षीरसागर यांनी दिली आहे. यावरुन शिवाजी नगर पोलीसात रवींद्र क्षीरसागर व इतरांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे आता क्षीरसागर कुटुंबातील वाद अधिक चिघळले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!