बीड परळी

परळी उपजिल्हा रुग्णालयातील एक्स रे टेक्निशियनची आत्महत्या

चिठीमुळे गुढ वाढले

परळी उपजिल्हा रुग्णालयातील एक्सरे टेक्निशयनने आत्महत्या केल्याची घटना आज घडली. दरम्यान मयताने लिहलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून या चिठीमुळे आत्महत्येचे गुढ वाढले आहे.
सिध्दार्थ पंडितराव जाधव हे परळी उपजिल्हा रुग्णालयात दोन महिन्यापूर्वीच एक्सरे टेक्निशियन म्हणून रुजू झाले होते. ते उपजिल्हा रुग्णालय परिसरात असलेल्या कर्मचारी वसाहतीत राहत होते. ते आज त्यांच्या रुममध्ये फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. दरम्यान मयत जाधव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली असून ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या चिठीमुळे आत्महत्येचे गुढ उकलण्याची शक्यता आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!