बीड- राज्यभर गाजत असलेल्या द्वारकदास मंत्री बँकेच्या तपासात पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांच्यावर तक्रादाराने उपस्थित केलेले आक्षेप न्यायालयाने मान्य करत चौकशी अधिकाऱ्यावर ताशेरे ओढले . तकरदाराच्या मागणीनुसार या प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत करण्यासाठी दुसरी याचिका दाखल करण्याचे आदेश दिले,त्यामुळे आता सारडा अँड कंपनीचा पाय आणखीनच खोलात जाणार आहे.
बीड येथील द्वारकदास मंत्री बँकेत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याची तक्रार उच्च न्यायालयात दाखल झाली होती.न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यासाठी गेलेल्या वर्ग एक दर्जाच्या अधिकाऱ्याला बाहेर बसवून तपासी अधिकारी डीवायएसपी वाळके हे आरोपींच्या नातेवाईकांसोबत गप्पा मारत बसले होते.
या सगळ्या प्रकाराची माहिती तक्रारदार बळी चव्हाण यांनी न्यायालयात दिल्यानंतर न्यायालयाने तपासी अधिकारी वाळके यांच्यावर ताशेरे ओढले.या प्रकरणी आरोपीनी केलेल्या अपहारातील 94 कोटी रुपये दंड व्याज वसूल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. एसआयटी मार्फत तपास हवा असल्यास स्वतंत्र याचिका दाखल करावी असेही न्यायालयाने म्हटले आहे. बँक असो की इतर गुन्हे यामध्ये पोलीस अधिकारी कशाप्रकारे तपासात दिरंगाई करतात हे या प्रकरणावरून पुन्हा एकदा समोर आले आहे.आता तरी वाळके हे इमानदारीने तपास करतील अशी अपेक्षा आहे.