बीड, दि. 17 (लोकाशा न्यूज) : वाहन हस्तांतरणाच्या पेपरवर चक्क खोट्या सह्या केल्याचा प्रकार येथील आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपीकाने उघडकीस आणला आहे. हा प्रकार उघडकीस आणल्यामुळे तिघांनी त्या वरिष्ठ लिपीकास जिवे मारण्याचीही धमकी दिली आहे. याबाबत बीड ग्रामीण ठाण्यात वरिष्ठ लिपीकाने दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रमसिंग राजपुत हे येथील आरटीओ कार्यालयात वरिष्ठ लिपीक पदावर कार्यरत आहेत. 17 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता कार्यालयात ते आले असता कार्यालयातील रूम नं.चार मध्ये माझ्यासोबत वरिष्ठ लिपीक रमेश सोमवंशी, सुरेखा डेडवाल, कनिष्ठ लिपीक सविता कदम असे ते आस्थापना शाखेत कामकाज करत असताना आडीच वाजता विभागाच्या खिडकीवर असलम सय्यद हा वाहन (क्र. एम.एच. 23 ए.व्ही. 1543) व एम.एच. 17 बीएच 6129 या वाहनांचे वाहन हस्तांतरण करण्याचे पेपर घेवून आला व त्याने राजपुत यांच्याकडे दिले, त्यावर त्यांनी ते पेपर तपासले असता सादर करण्यावरील वरिष्ठ लिपीक व सहा प्रादेशीक परिवहन अधिकार्यांच्या खोट्या सह्या असल्याचे राजपुत यांच्या निदर्शनास आले. तेव्हा ेते त्यास म्हणाले, की तुम्ही सदर पेपरवर खोट्या सह्या करून आणले आहेत. त्यावर त्याने राजपुत यांना शिवीगाळ केली व तुम्ही कसे काय करत नाही, तुम्ही औरंगाबादला कसे जाता तुमच्याकडे बघून घेतो, म्हणून राजपुत यांना जिवे मारण्याची धमकी दिली व राजपुत यांच्या हातातील पेपर ओढून घेण्याचा प्रयत्न करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला, त्यानंतर पाच ते दहा मिनीटांनी पुन्हा राजपुत यांच्या खिडकीजवळ तो आला व त्याच्या मोबाईलवर त्याने शेख अमेर शेख रिझवान यास फोन लावून स्पीकरवर ठेवून त्या फोनवर तिकडून आमेर शेख हा राजपुत यांना फोनवरून शिवीगाळ करू लागला तसेच बोलला, की पेपरवर सह्या कसे काय करत नाही मी ऑफीसमध्ये येवून तुझ्याकडे पाहतो, असे तो म्हणाला. तसेच तुला जाता येता तुझ्याकडे पाहतो असे म्हणून राजपुत यांना जिवे मारण्याची धमकी दिली, त्यानंतर राजपुतसह सर्व कर्मचारी पोलिस ठाण्याला येत असताना शेख अदनान रिझवान हा कार्यालयाच्या समोरील परिसरात राजपुत यांना भेटला व आमचे पेपर आम्हाला परत देवून टाक नाही तर तुला आम्ही बघून घेवून म्हणून तुला इथे राहू देणार नाही अशी धमकी राजपुत यांना देण्यात आली. त्यानुसार बीड ग्रामीण ठाण्यात तीन आरोपींवर 353, 471,504,506, 507 व 34 भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.