बीड गेवराई

अवैध झाडांची लाकडे वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुसऱ्या ट्रकला समोरासमोर धडक; अवैध झाडांची लाकडे खुलेआम वाहतूक

कोळगांव दि.२२:- गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील जय भगवान पेट्रोल पंपाजवळ विशाखापट्टणम कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर अवैध झाडांची लाकडे घेऊन जाणारा ट्रक आणि मोठी ट्रक यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात झाला. यामध्ये वृक्षाची लाकडे घेऊन जाणारा ट्रकचे नुकसान झाले आहे. तर ड्राव्हरला किरकोळ मार लागला आहे. ही घटना दि.२२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी नऊ च्या सुमारास घडली.
गेवराई तालुक्यातील मादळमोही, कोळगाव तिंतरवणी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१वर मोठी खड्डे पडली असुन यामुळे अपघाताची मालिका सुरु आहे. दरम्यान दि.२२ ऑक्टोबर रोजी कोळगाव येथील जय भगवान पेट्रोल पंपाजवळ विशाखापट्टणम कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर अवैध वृक्षाची लाकडे घेऊन जाणारा ट्रक गाडीक्रमांक एम एच. २२ एन २२६८ आणि दहा टायर असणारा कंटेनर एमपी २९ व्ही ७१७५ यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात झाला. दरम्यान अवैध झाडांची लाकडे खुलेआम वाहतूक होत असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष आहे.तर अपघातानंतर स्थानिक चकलांबा पोलिस ती तासाने घटनास्थळी उशीरापर्यंत पोहचले नव्हते.

चौकट
कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघात होत आहे. महामार्गावर मोठ मोठी दिड फुटाचे खड्डे पडले आहेत. ते खड्डे दिसत नाहीत,त्यामुळे वाहनधारक खड्डात पडुन मोठी दुखापत होत आहे,राष्ट्रीय महामार्ग आभिंयाता व गुत्तेदार साफ दुर्लक्ष करत विशेष म्हणजे या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकास अंदाज येत नसल्याने अपघाताची मालिका सुरु आहे. एकीकडे टोलवसुली जोरात सुरू आहे, तात्काळ पडलेली खड्डे बुजवून वाहनधारकांच्या जिवीताशी खेळु नये अशा इशारा वाहनधारकांनी दिला छावा संघटनेचे उपाध्यक्ष राहुल हाकाळे यांनी दिला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!