बीड राजकारण

खा.प्रितमताईंच्या नेतृत्वात गोपीनाथगडावरून सकाळी भगवान भक्तीगडाकडे निघणार भव्य रॅली

बीड- संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याला लाखोंचा जनसागर उसळणार आहे. हा दसरा मेळावा कोणत्याही जातीपातीचा, कोणत्याही वर्गाचा नाही. हा डोंगर कपारीतील कष्टकर्‍यांचा, वंचितांचा मेळावा आहे. या मेळाव्याला येणारा कार्यकर्ता हा विचारांची ऊर्जा घेऊनच जातो. परंपरेप्रमाणे खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात दसरा मेळाव्यानिमित्त गोपीनाथ गड ते भगवान भक्तीगड अशी भव्य रॅली होणार आहे. गोपीनाथगड लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या दर्शनानंतर खा.प्रितमताई मुंडे सकाळी सहा वाजता रॅलीला सावरगाव घाटकडे मार्गस्थ होणार असून सिरसाळा, तेलगाव, वडवणी, घाटसावळी, बीड, वंजारवाडी, नायगाव मयूर मार्गे रोहतवाडी, चुंबळीहुन सावरगाव घाटला पोहोचणार आहे. मेळाव्यानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तरी या रॅलीत ठिक ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!