बीड गेवराई

दोन ट्रकच्या भीषण अपघातात दुचाकी चिरडली; जातेगावच्या बापलेकासह 4 जण ठार

पुणे-अहमदनगर मार्गावरील सुपा येथे घडली घटना

बीड:- अहमदनगर जवळील सुपा येथे दुचाकी दोन ट्रकच्या मधोमध चिरडल्याने भिषण अपघात झाला. यामध्ये गेवराईच्या बाप-लेकासह ट्रक चा चालक व किन्नर यांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे.अपघातात ठार झालेले बाप-लेक हे गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील आहेत.
गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील राजाभाऊ विष्णुपंत चव्हाण व त्यांचा मुलगा पुरुषोत्तम राजाभाऊ चव्हाण हे सुपा अहमदनगर रोडवर दुचाकीवरुन प्रवास करत होते. यावेळी रोडवर ओव्हरटेक करत असताना त्यांची मोटारसायकल दोन ट्रकच्या मध्ये चिरडली गेली. या अपघातात चव्हाण पिता-पुत्रासह एका ट्रकचा ड्रायव्हर व किन्नर असे चौघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर या चौघांचेही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पारनेर उपजिल्हा रुग्णालयात येथे नेण्यात आले असल्याची माहिती सुपा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन गोकवे यांनी दिली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!