छातीत दुखू लागल्याने 40 वर्षीय महिलेला हॉस्पिटलमध्ये घेवून जात असताना चिखलात गाडी फसली चिखलात गाडी फसल्यानंतर गाडीतच महिले चा मृत्यू झाला वेळेवर उपचार न मिळाल्याने आणि रस्त्याच्या दुरावस्थेने चाळीस वर्षीय महिलेचा बळी घेतला. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. गेवराई तालुक्यातील चकलंबा-चोरपुरी रस्त्यावर काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली आशाबाई उमाजी गंडे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.सोमवारी दुपारी आशाबाई उमाजी गंडे या अपंग महिलेच्या छातीत दुखू लागल्या मुळे अत्यवस्थ वाटू लागले होते. त्यामुळे आशाबाई यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी चारचाकी गाडी घेऊन निघाली. मात्र वाटेतच चिखलात ही गाडी फसली. काळी माती त्यात चिखल होते. चालकाने अथक परिश्रम करुन देखील गाडी काही केल्या निघत नव्हती, तर आशाबाई यांना वाटेत रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कुठला पर्याय देखील उपलब्ध नव्हता. दरम्यान वेळेवर उपचार मिळू न शकल्याने आशाबाई यांचा गाडीतच मृत्यू झाला.