बीड

सीईओ कुंभारांची बदली; अजित पवार यांच्या हाती बीडचे सुत्रे

बीड, दि.20 (लोकाशा न्युज) ः बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांची नुकतीच मुंंबई महानगर पालिकेच्या सहआयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी पुणे येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता अजित पवार हे बीडचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. राज्य सरकारने आठ आयएएस अधिकार्‍यांच्या शुक्रवारी दि.20 ऑगस्ट रोजी बदल्या केल्या असून यामध्ये अजित कुंभार यांचा समावेश आहे. बीड येथे येणारे अजित पवार हे पुणे येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी (जात पडताळणी) हे म्हणून कार्यरत होते. त्यांची बदली आता बीडच्या सीईओ पदी करण्यात आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!