बीड

गुरुपौर्णिमेनिमित्त आ.संदीप क्षीरसागर काकू-नानांच्या समाधीवर नतमस्तक, भैय्या म्हणाले ‘काकू-नाना’च माझे गुरु अन् शक्तीस्थान

बीड (प्रतिनिधी):-  आई-वडिल हे मुलांचे पहिले गुरु असले तरी मुलांवर कुटूंबात सर्वाधिक संस्कार हे आजी-आजोबा करत असतात. त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकत असतात. लढण्याचं बळ घेत असतात. आजी-आजोबा खरंतर मुलांचे सगळ्यात मोठे शक्तीस्थान अन् विद्यापीठ असतात. गुरुपोर्णिमानिमित्त बीडचे आ. संदीप क्षीरसागर यांनी काकू-नानांच्या समाधीवर नतमस्तक होत आज त्यांचे आशिर्वाद घेत आजी-आजोबाच आपले गुरु अन् शक्तीस्थान असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.गुरुपोर्णिमेनिमित्त प्रत्येकजण आपल्या गुरुंप्रती भावना, आदर व्यक्त करत असतो. त्यांच्या चरणावर नतमस्तक होत असतो. कुणी आई-वडिलांच्या तर कुणी शाळा, महाविद्यालयासह ज्या त्या क्षेत्रातील गुरुंच्या चरणी नतमस्तक होतो. बीड विधानसभेचे आ. संदीप क्षीरसागर हे गुरुपोर्णिमेनिमित्त आपल्या आजी स्व. केशरकाकू व आजोबा सोनाजीराव क्षीरसागर यांच्या समाधीस्थळी जावून नतमस्तक झाले. तसेच त्यांनी सोशल मिडीयावर हे फोटो टाकत काकू-नानाच आपले गुरु व शक्तीस्थान असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या फोटोवरुन दिवसभर सोशल मिडीयावर धुमाकूळ सुरु होवून आ. संदीप क्षीरसागरच खरे काकू-नानांच्या राजकीय व सामाजिक विचारांचे व कार्याचे वारसदार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!